Total Pageviews

Wednesday, July 17, 2013

Science Smiles विज्ञान हास्य

Find more at  

http://mavipapunevibhag.blogspot.in/


एक अप्रतिम पुस्तक

अतिशय मोजक्या शब्दात आणि रेखाचित्रांमधून पदार्थविज्ञानाची वाटचाल रंजकपणे उलगडून दाखवणारे पुस्तक - स्टोरी ऑफ फिजिक्स -
 यातले काही नमुने पहा -

पायथागोरस

कोपर्निकस


गॅलिलीओ
 न्यूटन
 लेडन
 बेंजामिन फ्रँक्लिन
 मायकेल फॅरेडे
 थॉमस यंग
  आईन्स्टाईन
 रुदरफोर्ड
 निल्स बोर
 हायझेनबर्ग

 एस्. एन्. बोस, फर्मी
 आणि अनेक संशोधक ---

जरूर विकत घ्या, वाचा, संग्रही असू द्या 







विज्ञानाबद्दल काही काय म्हणतात ---


अल्बर्ट आईनस्टाईन –


दोन गोष्टींना अंत नाही.
एक म्हणजे – विश्व आणि
दोन म्हणजे – माणसाचा वेडेपणा.
मला पहिल्या गोष्टीबद्दलच जरा शंका आहे.



जॉर्ज बर्नॉर्ड शॉ


विज्ञानाला एक समस्या सोडवण्यासाठी
नव्या दहा समस्या निर्माण कराव्या लागतात. 






नील्स बोअर


पूंज सिद्धांत ऐकून ज्याला झटका बसला नाही
त्याला तो समजलाच नाही. 





गॅलिलीओ गॅलिली
जे जे मोजणे शक्य ते ते मोजा
आणि मोजणे शक्य नसेल ते मोजण्याजोगे करा.





कार्ल सगन
कुठे तरी अमूल्य असे काही तरी
ज्ञात होण्याची वाट बघतंय





रिचर्ड फाइनमन
विज्ञानाने - नक्की काय - ते सांगता येते
असे वाटणे, हीच एक त्रुटी आहे.





सर फ्रान्सिस डार्विन
सर्वात बलवान सजीव वाचतो असं नाही
किंवा सर्वात बुद्धिमान सजीव वाचतो असंही नाही
तर जो सर्वात झटपट प्रतिसाद देतो तो सजीव वाचतो.




पी व्ही सुब्रह्मण्यम चंद्रशेखर
‘नवा शोध’ - म्हणजे मला सापडू शकलेली कल्पना किंवा मर्म,
असे मी मानत नाही तर ‘नवा शोध’ - म्हणजे
एखादी गोष्ट सतत तिथेच होती ती
उचलून दाखवण्याची मला मिळालेली संधी


विनोबा भावे

राजनीति + विज्ञान = सर्वनाश
अध्यात्म + विज्ञान = सर्वोदय


गोट्या शाळेतून संख्याशास्त्र शिकून येतो - - - 

आई तांदूळ निवडत असते.
गोट्या म्हणतो "आई, आमच्या शाळेतल्या बाई 10% गर्भार आहेत" 
आई गोट्याला म्हणते - "कसं काय?"
गोट्या म्हणतो, "आम्हाला गणिताच्या बाईंनी शिकवलं"
आई गोट्याला म्हणते - "कसं काय?"
गोट्या म्हणतो, "आमच्या शाळेत 20 बाई आहेत त्यातल्या 2 गर्भार आहेत.
मग 2 भागिले 20 करायचे आणि त्याला शंभरनी गुणायचं. म्हणजे सरासरी उत्तर येतं.
2/20 = 0.1.
0.1x100=10
म्हणून एक एक बाई 10% गर्भार आहेत" 



वजन मर्यादा 10 टन

मधुमेही मुंग्या?




औषधांची रेलचेल

सोनोग्राफीत बाळ





वजन कमी करण्याचा छोटासा व्यायाम

अतिशय सोपा आणि सुटसुटीत व्यायाम आहे.
आधी मान पूर्णपणे डावीकडे फिरवा,
नंतर पूर्णपणे उजवीकडे फिरवा.
हीच क्रिया सतत करत रहा.
विशेषत: कोणी तुमच्या आवडीचे खाद्यपदार्थ ताटात घेऊन सामोरे आले की
ते निघून जाईपर्यंत हा व्यायाम करत रहा.

माझे डाएटींग 



शंकर पार्वती संध्याकाळी कैलासावर ....
एकदा शंकर पार्वती संध्याकाळी सूर्यास्ताची शोभा बघत उभे होते.
आल्हाददायक रंगांनी आकाश भरून ओसंडले.
सूर्य मावळला तरी आकाश आपल्या रंगाविष्काराचा खेळ कितीतरी वेळ खेळत होते.
अंधार पडला.
शंकर पार्वती यांच्या रोजच्या फेरीसाठी नंदी विमान तयार करत होता.
शंकरांची तयारी झाली. ते पार्वतीची वाट पहात होते. पण त्यांना काही हालचाल दिसेना. ते आत आले – पार्वतीबाई तयार नव्हत्या.
शंकर म्हणाले – चला, आकाशमार्गाने जाऊन कोणी दु:खी कष्टी आहे का पाहू.
पार्वतीबाई म्हणाल्या - आज मी येत नाही, खूप कामं पडलीत.
शंकर म्हणाले – असं कसं चालेल. विश्वनिर्मात्याने नेमून दिलेलं काम करायलाच पाहिजे.
पार्वतीबाई म्हणाल्या - आता गणपतीचे दिवस आले. शिवाय गौरीही येणार. खूप कामं पडलीत.
शंकर म्हणाले – मग मी एकटाच जातो. आणि ते निघालेसुद्धा.
पार्वतीबाई विमान दिसेनासं होईपर्यंत बघत राहील्या. घरात जाऊन कामाला लागल्या. पण मन रमेना. आपण गेलो नाही याची रुखरुख वाटायला लागली.
त्यांनी विचार केला शंकरांना फोन तरी लावू.
पण ते शक्य झालं नाही. शंकर कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असल्याचे सांगत होते.
पार्वतीबाईनी विचार केला ऑनलाईन आहेत का बघू किंवा इ-मेल करू.
पण त्यांना संगणक चालवता आला नाही, 
कारण - 
गणपती माऊस घेऊन गेला होता.


गोट्या शाळेतून संगणक शिकून येतो - - - 

आई तांदूळ निवडत असते. 
ती गोट्याला म्हणते - 
"जा, बेकरीतून ब्रेड आण आणि अंडी असतील तर बारा आण."
गोट्या जातो आणि बारा ब्रेड घेऊन येतो.
कारण,
बेकरीत अंडी असतात.

गोट्या शाळेतून रोमन अंक शिकून येतो - - - 

आई तांदूळ निवडत असते. 
ती दोन बोटांनी खूण करून गोट्याला म्हणते  - 
"डब्यातून लाडू घे".
गोट्या आनंदून डब्यातले पाच लाडू घेतो. 
कारण,
तो रोमन अंक शिकून आलेला असतो.

एक कंजूस माणूस आणि प्रवास

एक कंजूस माणूस असतो.
तो नेहमी उन्हाळ्यातच प्रवास करतो.
कधी हिवाळ्यात प्रवास करायची वेळ आली तर त्याला फार मनस्ताप होई.
कारण
हिवाळ्यात सर्व वस्तू आकुंचन पावतात मग रस्तेही आकुंचन पावत असणार ---
म्हणजे प्रवासाचे अंतर कमी झाले तरी भाडे मात्र उन्हाळ्याइतकेच द्यायचे! 
हे बरोबर नाही.
त्यापेक्षा हिवाळ्यात प्रवास टाळला तर आपले नुकसान तरी टळेल!

 प्राण्यांना - मानसिक ताण

सारखी वीज जाते. काय करणार? 

विश्व प्रसरण पावत आहे....

आधुनिक राहाणी म्हणजे सगळं संगणकीकरण




आम्ही सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक दोन्हीं ज्ञानांवर समान भर देतो.


सैद्धांतिक ज्ञानामध्ये कारण कळतं पण घडवता येत नाही.


प्रात्यक्षिक ज्ञानामध्ये घडवता येतं पण कारण कळत नाही.




आम्ही दोन्हीतले शेवटचे शब्द अंमलात आणतो – 
आम्हाला घडवता येत नाही आणि कारणही कळत नाही.




एक माणसाला रसायनशास्त्र विभागात जाऊन चव्हाण सरांना भेटायचं असतं.

तो माणूस एका सुशिक्षित दिसणार्‍या माणसाला विचारतो – रसायनशास्त्र विभाग कुठंय?
सुशिक्षित दिसणारा माणूस म्हणतो – व्हॉट?
तो माणूस म्हणतो – चेमिस्ट्री डिपार्टमेंट कुठे आहे?
सुशिक्षित दिसणारा माणूस म्हणतो – चेमिस्ट्री नाही केमिस्ट्री
तो माणूस म्हणतो – केमिस्ट्री डिपार्टमेंट कुठे आहे?
सुशिक्षित दिसणारा माणूस म्हणतो – इथेच आहे. काय काम आहे?
तो माणूस म्हणतो – मला कव्हाण सरांना भेटायचं आहे.
सुशिक्षित दिसणारा माणूस म्हणतो – कव्हाण नाही चव्हाण
तो माणूस म्हणतो – चूक झाली. सॉरी सॉरी. कूक झाली.


तारायंत्र गेले आणि ताराही





सूक्ष्मजीवशास्त्रज्ञाची नजर !





अतिहुशारांना लांबचं दिसत (जवळचं नाही)



स्टिव्ह जॉबचा मृत्यू झाल्यावर -

तो स्वर्गाच्या दाराशी पोचला.
आतून आवाज आला - "कोण आहे बाहेर"
स्टिव्ह जॉब म्हणाला - "मी स्टिव्ह जॉब ऍपलचा निर्माता."
आतून आवाज आला -"ऍपल? हं ! फार वर्षांपूर्वी एका ऍपलनी स्वर्गात गोंधळ माजवला होता. एक पुरूष, एक बाई आणि एक अजगरही त्यात होते. एकटाच आलाएस का सगळ्यांना घेऊन?" 



असं म्हणतात की घरात असताना छत्री उघडली की ..

वाईट दिवस येतात.

बाहेर पाऊस पडत असताना भिजू नये म्हणून घरात छत्री उघडायला लागणं हेच -
वाईट दिवस आल्याचं लक्षण आहे.


मोठेपणी अनेकजण राक्षस - पर्‍या..

यांच्यावर विश्वास ठेवत नाही. पण रोजच्या वर्तमानपत्रातलं भविष्य आवर्जून पहातात.


आज माझ्या कपात तळाशी चहाचा चोथा आला-

किती दुर्दैवी मी !

खरं तर मी कॉफी मागितली होती.


वाटेत काळं मांजर येणं चांगलं नसतं 

विशेषत: उदरांना तर नक्कीच !


आज कामचुकार दिन

आज शनिवारची आवस काम न करणार्‍यांची पर्वणी.

 आपण मोठा 'शुगर क्यूब' बघत आहात

गाडीचा क्रमांक आहे C6H12O6  म्हणजे ग्लुकोज. गाडीचे नाव आहे 'क्यूब'. म्हणजे झाला 'शुगर क्यूब'



काही तरी नक्की बिघडलंय - समजत नाही. 

हे बघ आपली हवा शुद्ध आहे, पाणी शुद्ध आहे, आपण शारीरिक मेहनत करतो, अन्न खातो ते ही सेंद्रिय आणि तरी तिशीपर्यंतच जगतो. कशामुळे समजेना झालंय !





Yashashree Punekar pharach mast...P.G.Woodhouse chya kisshyanchi athawan jhali.

उष्णतेमुळे द्रव स्थायू होतो?

उष्णतेमुळे पदार्थाची स्थिती बदलते हे बाई वर्गात शिकवत होत्या.
बर्फ स्थायू असतो त्याला उष्णता दिली की त्याचे पाणी म्हणजे द्रवरूप होते.
पाणी द्रव असते त्याला उष्णता दिली की त्याची वाफ म्हणजे वायूरूप होते - असे बाईंनी सांगितले. 
गोट्याने हात वर केला तो पाहून बाई म्हणाल्या - "तुला काही शंका आहे का?"
गोट्या म्हणाला - "भज्याचे पीठ पातळ म्हणजे द्रव असते तर ते तापवल्यावर भजी रूपात ते स्थायू कसे होते?"




विसराळू रसायनशास्त्रज्ञ

एकदा एका रसायनशास्त्रज्ञाचे डोके दुखायला लागते.
त्याला डोकेदुखी थांबवणारी औषधाची गोळी घ्यायची असते.
पण त्याला काही केल्या औषधाचे नाव आठवत नाही.
त्याच्या प्रयोगशाळेत एक नवा तरुण संशोधक नुकताच रुजू झालेला असतो.
रसायनशास्त्रज्ञ त्याला विचारतो - "तुझ्याकडे ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड आहे का?"
नवा तरुण संशोधक म्हणतो - "सर, तुम्हाला ऍस्पिरीन म्हणायचंय का?"
रसायनशास्त्रज्ञ सुटका झाल्यासारखा म्हणतो - "अगदी बरोबर. तु आत्ता सांगितलंस ते नाव माझ्या लक्षातच राहात नाही"


खूप खूप मन लावून एका वैज्ञानिकाने सोप्यात सोप्या शब्दात एक भाषण दिले.

त्यानंतर लोकांच्या शंकाचे समाधान करता करता तो हैराण झाला.
त्यात एका व्यक्तीने खूप लांबलचक बोलून एक शंका विचारली.
तेव्हा वैज्ञानिक म्हणाला -
'मी काय म्हणालो त्यावर तुमचा विचार तुम्हाला नक्की समजलाय यावर तुमचा भरोसा आहे हे मी समजतो पण तुम्ही ऐकलेल्या शब्दांचा मला अभिप्रेत असलेला अर्थ तुम्हाला उमगला आहे याबद्दल मला खात्री नाही '
आणि सभागृह रिकामे झाले

कोलेस्टेरॉल फ्री -----

एकदा एक चिकित्सक माणूस किराणा तेल विकत घ्यायला गेला.
दुकानदाराने विचारले - "कोणते तेल देऊ?"
चि. मा. म्हणाला - "कोणकोणती आहेत."
दुकानदारांने तेलाच्या 1 लिटरच्या पिशव्या काऊंटरवर ठेवल्या.
चि. मा. ने पिशव्यांची आकार, प्रकार, कंपनी, किंमत, ऑफर नीट पाहून एक पिशवी पसंत केली.
दुकानदाराला नोटा दिल्या. उरलेले पैसे नीट मोजून परत घेतले. दुकानदाराकडे पाहू लागला.
दुकानदाराने विचारले - "आणखी काय?"
चि. मा. म्हणाला - "कोलेस्टेरॉल कुठंय?"
दुकानदाराने विचारले - "म्हणजे?"
चि. मा. म्हणाला - "कोलेस्टेरॉल फ्री - पिशवीवर लिहीलंय. ते द्या."
दुकानदार म्हणाला - "आम्हालाच नाही दिलं डिलरनं तर आम्ही कुठुन देणार?"




(द्विमान पद्धतीत दोनच अंक असतात 0 आणि 1. मग '10' म्हणजे किती?)


एकदा काही शास्त्रज्ञ डब्बा ऐसपैस खेळत होते -
आईनस्टाईनवर राज्य होतं. ते खेळत होते तिथं एक एक चौरस मीटर आकाराची फरशी होती. न्यूटन त्या फरशीवर जाऊन उभा राह्यला. १०-२०-३०-४०-------१०० आईनस्टाईननं डोळे उघडले. त्याला समोर न्यूटन दिसला. त्याच्याकडे बोट दाखवून आईनस्टाईन म्हणाला -  
न्यूटन चौरस मीटर फरशीवर - डब्बा ऐसपैस"
न्यूटन म्हणाला " साफ चूक - मी आता पास्कल झालो आहे. "

For Other jokes / cartoons  related to science please visit http://mavipapunevibhag.blogspot.in/2013/07/science-with-smile.html

No comments:

Post a Comment