Total Pageviews

Sunday, March 17, 2013

http://mavipapunemar13prgm.blogspot.in/2013/03/film-show-with-discussion.html


मंगळवार, १९ मार्च २०१३
चित्रपट व चर्चा:-
विषय :- लाख मालाची गोष्ट
चर्चासत्र सहभाग:- श्रीमती अंजली चिपलकट्टी
वेळ:- सायं. ६.३० वाजता
स्थळ:- काळे सभागृह, इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स,
जंगली महाराज चौक, शिवाजीनगर, पुणे०५

The Story Of Stuff Annie Leonard द स्टोरी ऑफ स्टफ – अॅनी लिओनार्ड यांनी पर्यावरण जागृतीसाठी एक लघुपट तयार केला. तो सर्वानी पाहावा म्हणून यु-टयूब वर अपलोड केला. आपण रोज जगताना अनेक उत्पादने वापरतो ती उत्पादने तयार करताना किती प्रकारच्या क्रिया कराव्या लागतात आणि त्यासाठी निसर्गाचे किती दोहन होते हे या लघुपटात दाखवले आहे. जगातल्या दोनशेहून अधिक भाषांमध्ये या लघुपटाचे रुपांतर झाले आहे. अंजली चिपलकट्टी व सहकाऱ्यांनी त्याचे मराठीत रुपांतर केले आहे. २५ मिनिटाच्या या लघुपटानंतर त्यावर चर्चा होईल.

No comments:

Post a Comment